• translator icon

    हेल्थ इन्श्युरन्स

    हेल्थ गार्ड

    HealthGuard

    महत्त्वाची वैशिष्ट्ये

    तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी ऑल-राउंडर GST फ्री हेल्थ कव्हर

    कव्हरेज हायलाईट्स

    तुमच्या आरोग्यासाठी मिळवा सर्वसमावेशक कव्हरेज
    • Bullet Icon
    • सर्वोत्तम प्लॅन्समधून निवडा

    तुमच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एकाधिक प्लॅन्समधून निवडा

    • Bullet Icon
    • विस्तृत विमा रक्कम पर्याय

    ₹3 लाखांपासून ते ₹1 कोटींपर्यंत तुमच्यासाठी योग्य विमा रक्कम निवडा

    • Bullet Icon
    • अमर्यादित पुनर्नवीनीकरण लाभ आणि रिचार्ज

    क्लेमनंतर विमा रक्कम संपली तरीही अमर्यादित वेळा तिच्‍या पुनर्नवीनीकरणचा लाभ मिळवा

    • Bullet Icon
    • मॅटर्निटी आणि नवजात बाळाची काळजी

    बाळाच्या डिलिव्हरीशी संबंधित वैद्यकीय खर्च आणि नवजात बाळाच्या उपचारांसाठी निवडक प्लॅन्स अंतर्गत कव्हर केले जातात

    • Bullet Icon
    • प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी

    निवडलेल्या प्लॅननुसार 2/3 पॉलिसी रिन्यूवल नंतर वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी मिळण्यास सुरुवात करा

    • Bullet Icon
    • ऑनलाईन सवलत

    आमच्या वेबसाइटवरून किंवा आमच्या बजाज जनरल ॲपवरून पॉलिसी खरेदी केल्यावर फ्लॅट 5% सवलत मिळवा

    • Bullet Icon
    • झोन सवलत

    तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून झोन B साठी 20% आणि झोन C साठी 30% सवलत प्राप्त करा

    • Bullet Icon
    • फिटनेस सवलत आणि वेलनेस सवलत

    रिन्यूवलवर निरोगी सवयींसाठी 12.5% पर्यंत वेलनेस सवलत प्राप्त करा

    • Bullet Icon
    • टीप

    कृपया तपशीलवार अटी व शर्तींसाठी पॉलिसी मजकूर वाचा

    समावेश

    काय कव्हर केले जाते?
    • Bullet Icon
    • हॉस्पिटलायझेशन आणि डे केअर खर्च

    इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी कव्हरेज (रुम भाडे प्रकार निवडीसह), सर्व प्रकारच्या डे केअर उपचार प्रक्रिया आणि सर्जरी

    • Bullet Icon
    • प्री आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशन खर्च

    प्री-हॉस्पिटलायझेशन खर्च (60 दिवसांपर्यंत) आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशन खर्च (90 दिवसांपर्यंत) पॉलिसीच्या अटींनुसार कव्हर केले जातात

    • Bullet Icon
    • अवयव दाता खर्च

    अवयव काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान अवयव दात्याच्या रुग्णालयातील उपचारांचा वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो, मात्र त्यासाठी अट अशी आहे की, विमाकृत व्यक्ती हाच त्या दान केलेल्या अवयवाचा प्राप्तकर्ता असावा

    • Bullet Icon
    • AYUSH हॉस्पिटलायझेशन खर्च

    आजार किंवा शारीरिक दुखापतीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यावर आयुर्वेदिक, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथिक (AYUSH) उपचारांसाठी कव्हरेज

    • Bullet Icon
    • मॅटर्निटी आणि नवजात बाळाची काळजी

    बाळाच्या डिलिव्हरीशी संबंधित वैद्यकीय खर्च आणि नवजात बाळाच्या उपचारांसाठी निवडक प्लॅन्स अंतर्गत कव्हर केले जातात

    • Bullet Icon
    • विमा रक्कम पुनर्नवीनीकरण

    विमा रकमेची मर्यादा पूर्णपणे वापरली गेली असल्यास, पॉलिसीच्या अटींनुसार ती पुनर्नवीनीकरण केली जाईल. त्यामुळे आवश्यक असल्यास, त्याच पॉलिसी वर्षात आपल्या पुढील क्लेमसाठी तुम्‍ही पुन्हा संपूर्ण कव्हरेज लाभ घेऊ शकता (पॉलिसी अटींनुसार)

    • Bullet Icon
    • रिचार्ज (5 लाखांवरील SI साठी)

    दुर्दैवाने क्लेम केल्‍यामुळे विमा रक्कमेची लिमिट संपल्‍यास, विमा रक्कमेच्‍या अतिरिक्त 20% रक्कम (25 लाख पर्यंत) उपलब्ध असेल

    • Bullet Icon
    • संचयी बोनस

    जर कालबाह्य कालावधीमध्ये कोणताही क्लेम केला नसेल तर निवडलेल्या टक्केवारीनुसार रिन्यूवलच्‍या वेळी विमा रक्कम आपोआप वाढते

    • Bullet Icon
    • फ्लोटर आणि वैयक्तिक विमा रक्कम

    फ्लोटर प्लॅन असल्यास एकाच विमा रकमेमध्‍ये कुटुंबातील सदस्यांना कव्हर करण्याचा पर्याय, किंवा वैयक्तिक प्लॅन असल्यास प्रत्येकासाठी स्वतंत्र विमा रकमेचा पर्याय

    • Bullet Icon
    • टीप

    कृपया तपशीलवार अटी व शर्तींसाठी पॉलिसी मजकूर वाचा

    अपवाद

    काय कव्हर केले जात नाही?
    • Bullet Icon
    • प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी

    अपघातात झालेल्‍या जखमांच्या उपचारांव्यतिरिक्त, पहिल्या 30 दिवसांमधील उपचारांचा खर्च

    • Bullet Icon
    • पूर्व-विद्यमान आजार

    मधुमेह, अस्थमा, थायरॉईड आणि इतर PED सारख्या पूर्व-विद्यमान आजारांसाठी उपचार खर्च तुमच्या पहिल्या हेल्थ गार्ड पॉलिसीच्या तारखेपासून 36 महिन्यांपर्यंत वगळले जातात

    • Bullet Icon
    • विशिष्ट आजाराचे उपचार

    हर्निया, गाउट, एंडोमेट्रियोसिस आणि मोतीबिंदूसह विशिष्ट आजारांसाठी उपचारांचा खर्च तुमच्या पहिल्या हेल्थ गार्ड पॉलिसीच्या तारखेपासून 24 महिन्यांपर्यंत वगळला जातो

    • Bullet Icon
    • मॅटर्निटी खर्च

    मॅटर्निटी संबंधित उपचारांचा खर्च तुमच्या पहिल्या हेल्थ गार्ड पॉलिसीच्या तारखेपासून 72 महिन्यांपर्यंत वगळला जातो

    • Bullet Icon
    • वैद्यकीय तपासणी आणि मूल्यांकनासाठी खर्च

    प्रामुख्याने सध्याच्या निदान किंवा उपचारांशी संबंधित निदान प्रक्रिया आणि वैद्यकीय मूल्यांकनासाठी होणारा वैद्यकीय खर्च

    • Bullet Icon
    • आहार पूरक आणि पदार्थ

    डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी केलेल्या पूरक औषधांचा खर्च, ज्यामध्ये उपचारांचा भाग म्हणून वापरल्या जाणाऱ्या व्हिटॅमिन, मिनरल्स आणि सेंद्रिय पदार्थांचा समावेश आहे

    • Bullet Icon
    • कॉस्मेटिक सर्जरी खर्च

    वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असलेल्या उपचारांसाठी किंवा अपघात किंवा भाजल्यानंतर आवश्यक असलेल्या पुनर्रचनेसाठी नसलेले, सौंदर्य बदलण्यासाठी केलेले उपचार कव्‍हर केले जात नाही

    • Bullet Icon
    • स्वतःला इजा करून घेण्याच्या कृतींवरील उपचार

    स्वतःला इजा करून घेणे, नशेत असणे, बेकायदेशीर कृत्ये, धोकादायक उपक्रम इत्यादींमुळे झालेला वैद्यकीय खर्च.

    • Bullet Icon
    • वजावट आणि को-पे

    जर तुम्ही वजावट किंवा को-पे निवडले असेल तर क्लेमचा काही भाग तुम्हाला भरावा लागेल

    • Bullet Icon
    • टीप

    कृपया तपशीलवार अपवादांसाठी पॉलिसी मजकूर वाचा

    अतिरिक्त कव्हर्स

    तुम्हाला आणखी काय मिळू शकेल?
    • Bullet Icon
    • एअर ॲम्ब्युलन्स कव्हर (5 लाख आणि त्यावरील SI साठी उपलब्ध)

    पॉलिसीच्या कालावधीमध्ये आजारपण किंवा अपघाताच्या पहिल्या प्रसंगाच्या ठिकाणाहून विमान किंवा हेलिकॉप्टरने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जलद ॲम्ब्युलन्स वाहतुकीसाठी झालेला खर्च कव्हर करते

    • Bullet Icon
    • स्वैच्छिक एकूण वजावट

    ऐच्छिक एकत्रित वजावट मर्यादेच्या (₹50,000/₹1,00,000/₹2,00,000/₹3,00,000) पलीकडील इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन उपचारांसाठीचा वैद्यकीय खर्च, पॉलिसीच्या अटींनुसार निवडल्याप्रमाणे कव्हर केला जातो

    • Bullet Icon
    • हेल्थ प्राईम रायडर

    निवडलेल्या प्लॅननुसार प्रत्‍यक्ष किंवा ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन, डेंटल वेलनेस, भावनिक वेलनेस आणि आहार आणि पोषण कन्सल्टेशनसाठी कव्हरेज

    • Bullet Icon
    • रिस्पेक्ट रायडर (सीनिअर केअर)

    सीनिअर सिटीझन्स SOS अलर्ट, डॉक्टर ऑन कॉल आणि 24x7 ॲम्ब्युलन्स सेवा यासारख्या सेवेसह इमर्जन्सी सहाय्य प्राप्त करू शकतात

    • Bullet Icon
    • रुम कॅपिंगमध्‍ये सवलत

    हेल्थ गार्ड गोल्ड आणि प्लॅटिनम प्लॅन्ससाठी "सिंगल प्रायव्हेट एअर-कंडीशन केलेल्या रुमपर्यंत" रुम प्रकाराची मर्यादा हटवते आणि मर्यादेशिवाय प्रत्यक्ष रुम भाडे खर्चासाठी कव्हरेज प्रदान करते

    • Bullet Icon
    • अधिक ॲड-ऑन्स

    कव्हरेज वाढविण्यासाठी अधिक ॲड-ऑन्स पाहा

    तुमच्यासाठीचे खास लाभ

    alttext

    विस्तृत कव्हरेज

    तुमच्या आवश्यकतेनुसार तुमचे कव्हरेज निवडा

    alttext

    वेलनेस सवलत

    पॉलिसी वर्षादरम्यान फिट राहा आणि रिन्यूवलवर 12.5% सवलतीचा आनंद घ्या

    alttext

    पुनर्नवीनीकरण लाभ

    विमा रकमेचा पूर्ण वापर झाल्यानंतर SI च्‍या 100% पर्यंत पुनर्नवीनीकरण लाभ

    बजाज हेल्थ गार्ड पॉलिसी: लाभ, वैशिष्ट्ये आणि तुम्हाला आजच त्याची गरज का आहे

    संपूर्ण आत्मविश्वासाने तुमचे आयुष्य जगण्याची कल्पना करा, वैद्यकीय इमर्जन्सीमध्येही तुमचे आर्थिक नियोजन सुरक्षित राहील आणि तुमच्या उपचारांची उत्तम काळजी घेतली जाईल. ऐकायला दिलासादायक वाटतंय ना? हेल्थ गार्ड पॉलिसी नेमके हेच काम करते. आजच्या अनिश्चित जगात, जिथे वैद्यकीय खर्च वेगाने वाढत आहेत, एक मजबूत हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन असणे ही आता कोणतीही चैनीची गोष्ट नसून एक गरज बनली आहे.

    बजाज जनरल इन्श्युरन्स हेल्थ गार्ड नावाचे वैशिष्ट्यपूर्ण हेल्थ इन्श्युरन्स प्रॉडक्ट सादर करते, जे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण, मनःशांती आणि निरोगी भविष्य प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.

    या ब्लॉगमध्ये, आम्ही तुम्हाला हेल्थ गार्डविषयी आवश्यक असलेली सर्व माहिती जाणून घेण्यास मदत करू, ज्यामध्ये त्याचे प्लॅन्स, वैशिष्ट्ये, फायदे आणि उपलब्ध विविध हेल्थ इन्श्युरन्स पर्यायांमध्ये हे कसे खास ठरते याबद्दल माहिती दिली आहे. यासोबतच, तुम्ही सहजपणे ऑनलाइन हेल्थ इन्श्युरन्स कसा खरेदी करू शकता आणि तुमचे आरोग्य कसे सुरक्षित करू शकता हे देखील तुम्हाला समजेल.

    हेल्थ गार्ड म्हणजे काय?

    हेल्थ गार्ड ही बजाज जनरल इन्श्युरन्सद्वारे ऑफर केलेली सर्वसमावेशक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी आजारपण, शस्त्रक्रिया किंवा अपघाती दुखापतींमुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चाला कव्हर करते. ही पॉलिसी तुम्हाला हॉस्पिटलायझेशनचा खर्च, वैद्यकीय उपचारांचे बिल आणि इतर अनेक खर्चांपासून सुरक्षित ठेवते, ज्यामुळे तुम्हाला पैशांची चिंता न करता केवळ आरोग्यात सुधारणा होण्यावर लक्ष केंद्रित करता येते.

    ही पॉलिसी वेगवेगळ्या जीवनशैली आणि गरजांनुसार तयार करण्यात आली असून, यामध्ये सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम हे तीन लवचिक प्लॅन पर्याय उपलब्ध आहेत — ज्यांपैकी प्रत्येक प्लॅन विविध फायदे आणि विमा रक्कम प्रदान करतो.

    जरा नजर टाकूया

    तुमच्यासाठी तयार केलेल्या इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना करा

    प्लॅन्स
    alt

    हेल्थ गार्ड सिल्व्हर

    alt

    हेल्थ गार्ड गोल्ड

    alt

    हेल्थ गार्ड प्लॅटिनम

    हॉस्पिटल आणि डे केअर SI ₹1.5/ / 2 लाख ₹3 लाख ते ₹50 लाख ₹5 लाख ते ₹1 कोटी.
    रुम मर्यादा दररोज विमा रकमेच्या 1% पर्यंत आणि ICU चा प्रत्यक्ष खर्च 3 लाख ते 7.5 लाखांच्या विमा रकमेसाठी सिंगल प्रायव्हेट AC रुम | SI 10 लाख आणि त्याहून अधिक रक्‍कमेसाठी प्रत्यक्ष खर्च | ICU चा प्रत्यक्ष खर्च 3 लाख ते 7.5 लाखांच्या विमा रकमेसाठी सिंगल प्रायव्हेट AC रुम | SI 10 लाख आणि त्याहून अधिक रक्‍कमेसाठी प्रत्यक्ष खर्च | ICU चा प्रत्यक्ष खर्च
    प्री- आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशन आधी: 60 दिवस आणि नंतर: 90 दिवस आधी: 60 दिवस आणि नंतर: 90 दिवस आधी: 60 दिवस आणि नंतर: 90 दिवस
    अवयव दाता, AYUSH, आधुनिक उपचार विमा रकमेपर्यंत विमा रकमेपर्यंत विमा रकमेपर्यंत
    रोड अ‍ॅम्ब्युलन्स ₹20,000/पॉलिसी वर्ष ₹20,000/पॉलिसी वर्ष ₹20,000/पॉलिसी वर्ष
    प्रतिबंधात्मक तपासणी 3 वर्षांमध्ये एकदा SI च्या 1% (कमाल 2,000 पर्यंत) 3 वर्षांमध्ये एकदा SI च्या 1% (कमाल 5,000 पर्यंत) 2 वर्षांमध्ये एकदा SI च्या 1% (कमाल 5,000 पर्यंत)
    मॅटर्निटी आणि नवजात बाळाची काळजी कव्हर्ड नाही निर्दिष्ट मर्यादेनुसार निर्दिष्ट मर्यादेनुसार
    कॉन्व्हलेसन्स लाभ ₹5,000/पॉलिसी वर्ष ₹5 लाखांपर्यंतच्या विमा रकमेसाठी ₹5,000/पॉलिसी वर्ष | 7.5 लाख आणि त्यावरील विमा रकमेसाठी ₹7,500/पॉलिसी वर्ष ₹5 लाखांपर्यंतच्या विमा रकमेसाठी ₹5,000/पॉलिसी वर्ष | 7.5 लाख आणि त्यावरील विमा रकमेसाठी ₹7,500/पॉलिसी वर्ष
    विमा रक्कम पुनर्नवीनीकरण बेस विमा रकमेच्या 100% % बेस विमा रकमेच्या 100% % बेस विमा रकमेच्या 100% %
    वेलनेस सवलत रिन्यूवलवर निरोगी सवयींसाठी 12.5% पर्यंत वेलनेस सवलत रिन्यूवलवर निरोगी सवयींसाठी 12.5% पर्यंत वेलनेस सवलत रिन्यूवलवर निरोगी सवयींसाठी 12.5% पर्यंत वेलनेस सवलत
    अधिक कव्हर अधिक तपशिलासाठी पॉलिसी कागदपत्रे पाहा

    हेल्थ गार्डचे प्रमुख लाभ

    चला तर मग, हेल्थ गार्डच्या अशा वैशिष्ट्यांवर जवळून नजर टाकूया, जी इतर विविध प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसींचे मूल्यमापन करताना या पॉलिसीला एक सर्वोत्तम पर्याय बनवतात.

    1. इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन

    जेव्हा तुम्हाला किमान 24 तासांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते तेव्हा वैद्यकीय खर्च कव्हर केल्‍या जातो, ज्यामध्ये रुम भाडे, ICU, नर्सिंग, सर्जरी, डॉक्टरांचे शुल्क आणि निदान शुल्क यांचा समावेश आहे.

    2. प्री आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशन

    तुम्हाला हॉस्पिटलायझेशनच्या 60 दिवस आधी आणि डिस्चार्जनंतर 90 दिवसांसाठी झालेल्या खर्चासाठी कव्हर केले जाते. यामध्ये निदान चाचण्या, औषधे आणि कन्सल्टेशनचा समावेश होतो.

    3. डेकेअर प्रक्रिया

    हेल्थ गार्ड 24 तासांपेक्षा कमी हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असलेल्या वैद्यकीय प्रक्रियांना कव्हर करते. यामध्ये मोतीबिंदू, कीमोथेरपी, डायलिसिस आणि अशा इतर उपचारांचा समावेश आहे.

    4. AYUSH ट्रीटमेंट

    जेव्हा मान्यताप्राप्त AYUSH हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले जातात तेव्हा आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी साठी उपचारांचा खर्च कव्हर केला जातो.

    5. अवयव दाता खर्च

    जर तुम्ही अवयव प्रत्यारोपण करून घेत असाल, तर दान केलेले अवयव काढण्‍याशी संबंधित खर्च कव्हर केला जातो.

    6. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी

    नियमित अंतराने, तुम्हाला आरोग्य तपासणी रिएम्बर्समेंटचा लाभ मिळतो, ज्यामुळे आरोग्याची वेळेवर काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळते.

    7. मॅटर्निटी आणि नवजात बालकाचे कव्हर

    गोल्ड आणि प्लॅटिनम प्लॅन्स अंतर्गत, मॅटर्निटी खर्च आणि नवजात बाळासाठी कव्‍हरेज (90 दिवसांपर्यंत) यासोबत अनिवार्य लसीकरणाचा समावेश आहे.

    8. बेरियाट्रिक सर्जरी

    लठ्ठपणाशी संबंधित इतर आजारांमुळे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असल्यास, 36 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीच्‍या अधीन राहून, ही शस्त्रक्रिया कव्हर केली जाते.

    9. वेलनेस लाभ

    जर तुम्ही तुमचे आरोग्याचे निकष (जसे की ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि BMI) टिकवून ठेवल्यास, तुम्ही रिन्यूवलवर 10% पर्यंत ऑनलाईन सेव्हिंग्सचा आनंद घेऊ शकता, तसेच स्टेप काउंट निकष पूर्ण केल्यास अतिरिक्त 2.5% सूट मिळवू शकता.

    10. विमा रक्कम पुनर्नवीनीकरण

    पॉलिसी वर्षात तुमची विमा रक्कम संपल्यास, हेल्थ गार्ड तुमची 100% मूळ विमा रक्‍कम पुनर्नवीनीकरण करते — एकापेक्षा जास्त वेळा हॉस्पिटलायझेशन व्हावे लागल्यास हा एक मोठा दिलासा ठरतो.

    लवचिकता आणि परवडणारी क्षमता

    हेल्थ गार्ड केवळ व्यापक कव्हरेज ऑफर करत नाही, तर ते लवचिकता देखील प्रदान करते:

    1. पॉलिसी टर्म: 1, 2, किंवा 3-वर्षाच्या पॉलिसीमधून निवडा

    2. प्रीमियम देयक: वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक आधारावर देय करा

    3. वैयक्तिक किंवा फ्लोटर कव्हर: स्वतःचा, जोडीदाराचा, मुलांचा, पालकांचा, बहीण-भावांचा, सासू-सासऱ्यांचा आणि अगदी काका-काकू किंवा मामा-मामींनाही इन्श्युअर करा

    4. प्रीमियम झोन: झोन आधारित प्रीमियम तुम्हाला तुमच्या राहत्या शहरानुसार बचत करण्यास मदत करतात

    5. पर्यायी कव्हर: तुमच्या जीवनशैली आणि गरजेनुसार एअर ॲम्ब्युलन्स किंवा रुम भाडे माफी सारखे ॲड-ऑन्स निवडा

    या पर्यायांसह, तुम्ही तुमच्या हेल्थ प्रोफाईल आणि फायनान्शियल क्षमतेनुसार तुमचा हेल्थ गार्ड प्लॅन तयार करू शकता.

    पॉलिसी कागदपत्रे डाउनलोड करा

    एका क्लिकवर पॉलिसी तपशिलांमध्ये तत्काळ ॲक्सेस मिळवा

    ऑनलाईन सेव्हिंग्स आणि रिवॉर्ड्स

    बजाज जनरल इन्श्युरन्स हेल्थ गार्डला अधिक परवडणारे बनविण्यासाठी अनेक ऑनलाईन सेव्हिंग्स पर्याय ऑफर करते:

    1. फॅमिली सेव्हिंग्स: कुटुंबातील अनेक सदस्यांना कव्हर करण्यासाठी 10-15% सूट

    2. ऑनलाईन खरेदी सेव्हिंग: थेट ऑनलाईन खरेदी केलेल्या पॉलिसीसाठी 5% सूट

    3. वेलनेस सेव्हिंग्स: निरोगी मापदंड राखण्यासाठी 12.5% पर्यंत सूट

    4. लाँग-टर्म पॉलिसी सेव्हिंग: 2-वर्षासाठी 4% आणि 3-वर्षाच्या टर्मसाठी 8% सूट

    5. रुम भाडे कॅपिंग सेव्हिंग: कॅप्ड रूम रेंट पर्याय निवडल्यास 8% पर्यंत सूट

    हे लाभ हेल्थ गार्डला इतर प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये मौल्यवान आणि किफायतशीर उपाय बनवतात.

    प्री-पॉलिसी चेकअपबद्दल काय माहिती आहे?

    हेल्थ गार्ड ऑनबोर्डिंग प्रक्रिया सोपी करते:

    1. 45 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी कोणतीही वैद्यकीय चाचणी नाही (उत्तम आरोग्य असण्याच्या अटीवर)

    2. 45 पेक्षा जास्त वय असल्यास किंवा आरोग्याची कोणतीही समस्या असल्यास? तुम्हाला बजाज जनरल इन्श्युरन्सद्वारे आयोजित वैद्यकीय चाचण्यांसाठी मार्गदर्शन केले जाईल.

    3. तुमची पॉलिसी मंजूर झाल्यास वैद्यकीय चाचण्यांचा 100% खर्च रिफंड केला जातो

    यामुळे संरक्षणासाठी नोंदणी करताना तुमच्यावर कधीही अतिरिक्त भार पडणार नाही याची खात्री मिळते.

    सामान्य अपवाद

    प्रत्येक पॉलिसीप्रमाणेच, हेल्थ गार्डमध्ये जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी अपवाद देखील आहेत:

    1. पूर्व-विद्यमान आजार (36-महिन्याचा प्रतीक्षा कालावधी)

    2. काही विशिष्ट आजार (24-महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी)

    3. सांधे बदलणे किंवा बेरियाट्रिक सर्जरी (36-महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी)

    4. दातांचे, कॉस्मेटिक आणि फर्टिलिटी उपचार

    5. स्वतःला दुखापत करून घेणे, नशा करणे किंवा गुन्हेगारी कृत्ये

    6. भारताबाहेरील उपचार

    सविस्तर माहितीसाठी नेहमी पॉलिसीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा किंवा सल्लागाराशी संपर्क साधा.

    सुलभ क्लेम प्रक्रिया

    तुम्ही कॅशलेस उपचार निवडा किंवा रिएम्बर्समेंट, बजाज जनरल इन्श्युरन्स क्लेम जलद आणि सोपी करते.

    कॅशलेस क्लेम:

    1. नेटवर्क हॉस्पिटलला भेट द्या.

    2. तुमचे हेल्थ कार्ड दाखवा

    3. पूर्व-अधिकृतता मिळवा

    4. आम्ही बिलांची काळजी घेत असताना तुम्ही उपचारांवर लक्ष केंद्रित करा.

    रिएम्बर्समेंट क्लेम:

    1. कृपया क्लेम फॉर्म आणि सहाय्यक कागदपत्रे हेल्थ टीमकडे सबमिट करा.

    2. तुमचा क्लेम ऑनलाईन किंवा हेल्पलाईनद्वारे ट्रॅक करा.

    3. थेट तुमच्या खात्यामध्ये रिएम्बर्समेंट प्राप्त करा

    इन-हाऊस क्लेम टीम आणि विशाल हॉस्पिटल नेटवर्कसह, तुम्ही नेहमीच सुरक्षित ठिकाणी आहात.

    हेल्थ इन्श्युरन्स महत्त्वाचा का आहे?

    हेल्थ गार्ड प्लॅनची वैशिष्ट्ये जाणून घेण्यापूर्वी, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असणे का महत्त्वाचे आहे हे समजून घेऊया:

    1. वैद्यकीय महागाई दरवर्षी वाढत आहे, ज्यामुळे किरकोळ उपचार देखील महाग आहेत.

    2. आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही वेळी चेतावणीशिवाय येऊ शकतात.

    3. एकवेळच्या हॉस्पिटलायझेशनमुळे अनेक वर्षांच्या सेव्हिंग्सवर पाणी सोडावे लागू शकते.

    4. हेल्थ इन्श्युरन्स हे आर्थिक आधारावर प्रदान केले जातात. जेणेकरून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेशी तडजोड होत नाही.

    मार्केटमध्ये उपलब्ध अनेक प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसींमध्ये, हेल्थ इन्श्युरन्स ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, विशेषत: आजच्या जगात, जिथे जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे.

    हेल्थ गार्ड प्लॅन्सचे प्रकार

    बजाज जनरल इन्श्युरन्स हेल्थ गार्ड या प्रॉडक्ट अंतर्गत तीन सर्वसमावेशक व्हेरियंट ऑफर करते, प्रत्येक व्हेरियंट हा विविध बजेट लेव्हल आणि कव्हरेज गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे:

    1. हेल्थ गार्ड सिल्व्हर प्लॅन

    हा हेल्थ गार्ड रेंजमधील सर्वात मूलभूत प्लॅन आहे, जो परवडणारे संरक्षण शोधणाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंबांसाठी आदर्श आहे.

    महत्त्वाची वैशिष्ट्ये:

    1. इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन

    2. रोड ॲम्ब्युलन्स कव्हर

    3. अवयव दाता खर्च

    4. AYUSH ट्रीटमेंट

    5. कॉन्व्हलेसन्स लाभ

    6. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी

    विमा रक्कम पर्याय: ₹1.5 लाख आणि ₹2 लाख

    हेल्थ इन्श्युरन्स मध्ये नवीन असणारे किंवा मर्यादित बजेटमध्येही दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक आदर्श पर्याय आहे.

    2. हेल्थ गार्ड गोल्ड प्लॅन

    सिल्व्हर प्लॅनपेक्षा एक स्टेप अधिक असलेल्या या प्रकारात सिल्व्हर प्लॅनमधील सर्व लाभांसह, पुढील अतिरिक्त सुविधांचाही समावेश आहे:

    अतिरिक्त लाभ:

    मॅटर्निटी केअर (₹3 लाख ते ₹7.5 लाख विमा रकमेसाठी: नॉर्मल डिलिव्हरी साठी ₹15,000 आणि सिझेरियन डिलिव्हरी साठी ₹25,000; ₹10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक विमा रकमेसाठी: नॉर्मल डिलिव्हरी साठी ₹25,000 आणि सिझेरियन डिलिव्हरी साठी साठी ₹35,000)

    3. हेल्थ गार्ड प्लॅटिनम प्लॅन

    सीरिजमधील सर्वात प्रीमियम ऑफर पैकी एक असलेला प्लॅटिनम प्लॅन हा व्यापक लाभ प्रदान करते, त्रासमुक्त इन्श्युरन्स पर्यायाच्या शोधात असणाऱ्यांसाठी सर्वोत्तम.

    विशेष लाभ:

    1. रिचार्ज लाभ: ₹5 लाख पर्यंत अतिरिक्त विमा रक्कम

    2. 150% पर्यंत सुपर संचयी बोनस

    3. हवाई रुग्णवाहिका (वैकल्पिक)

    4. बेरियाट्रिक सर्जरी कव्हर (SI चे 50%, कमाल ₹5 लाख; 36-महिन्याचा प्रतीक्षा कालावधी)

    5. मॅटर्निटी आणि नवजात बाळाचे कव्हर

    6. दैनंदिन कॅश लाभ आणि कॉन्व्हलेसेन्स लाभ

    विमा रक्कम पर्याय: ₹5 लाख ते ₹1 कोटी

    जर तुम्हाला मूलभूत संरक्षणापेक्षा आणखी काही हवे असल्यास आणि सर्वांगीण हेल्थकेअर सुरक्षेच्या सुनिश्चितीसाठी प्लॅटिनम प्लॅन ही तुमची निवड असायलाच हवी.

    हेल्थ गार्ड नेमके कुणासाठी?

    हेल्थ गार्ड खालील सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त:

    1. सर्वसमावेशक, बजेट-फ्रेंडली हेल्थ कव्हर शोधणारे व्यक्ती

    2. नवीन विवाहित जोडपे किंवा मुलांचे प्लॅनिंग करणारे कुटुंब

    3. आजीवन रिन्यूवल सह व्यापक कव्हरेज शोधणारे सीनिअर सिटीझन्स

    4. कॅशलेस क्लेम आणि वेलनेस लाभ हवे असलेले कार्यरत व्यावसायिक

    5. हेल्थ इन्श्युरन्स सुलभपणे ऑनलाईन खरेदी करू इच्छिणारे पहिल्या वेळचे खरेदीदार.

    तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी, हेल्थ गार्डचे खास निर्मित व्हर्जन उपलब्ध आहे.

    अंतिम विचार: हेल्थ गार्ड - केवळ पॉलिसी नव्हे, आरोग्य संरक्षणाचा विश्वास

    आरोग्य ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. तिच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष न करता तुमची प्राथमिकता असली पाहिजे. हेल्थ गार्डसह, तुम्ही केवळ एक इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करत नाही, तर मनःशांती, आर्थिक सुरक्षितता आणि दर्जेदार आरोग्यसेवेच्या उपलब्धतेमध्ये गुंतवणूक करत आहात.

    बजाज जनरल इन्श्युरन्सद्वारे ऑफर केलेले, हेल्थ गार्ड तुम्हाला वैद्यकीय अनिश्चिततेच्या भीतीशिवाय तुमच्या अटींवर जीवन जगण्यासाठी आवश्यक लवचिकता, परवडणारी क्षमता आणि व्यापक कव्हरेज प्रदान करते.

    त्यामुळे, तुम्ही तरुण प्रोफेशनल असाल, पालक असाल किंवा सीनिअर सिटीझन असाल, पाऊल उचलण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. तुमचे पर्याय जाणून घ्या, लाभांची तुलना करा आणि आजच ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करा. आजच्या निर्णयाचे फळ भविष्यात निश्चितच मिळेल.

    आजच तुमचे कव्हरेज वाढवा!

    रिस्पेक्ट रायडर (सीनिअर केअर)

    टूलटिप टेक्स्ट

    ज्येष्ठ नागरीकांसाठी इमर्जन्सी सहाय्य

    विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाईन केलेले

    सुरुवात

    ₹907 + GST

    आत्ताच खरेदी करा

    हेल्थ प्राईम रायडर

    टूलटिप टेक्स्ट

    टेलि, इन-क्लिनिक डॉक्टर कन्सल्टेशन आणि तपासणी

    दंत, पोषण आणि भावनिक आरोग्य

    सुरुवात

    ₹298 + GST

    आत्ताच खरेदी करा

    गैर-वैद्यकीय खर्च

    टूलटिप टेक्स्ट

    अ-वैद्यकीय वस्तू कव्हर करते

    वस्तू ज्या सामान्यपणे मानकीकृत इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये कव्हर केल्या जात नाहीत

    सुरुवात

    8% % प्रीमियमचे

    आत्ताच खरेदी करा

    रुम कॅपिंग सूट

    टूलटिप टेक्स्ट

    सिंगल रुम प्रकारचा प्रतिबंध हटवते*

    कोणत्याही मर्यादेशिवाय प्रत्यक्ष रुम भाडे खर्च कव्हर करते

    सुरुवात

    2% % प्रीमियमचे

    आत्ताच खरेदी करा

    आरोग्याचा सोबती

    Healthassessment

    ट्रॅक करा, मॅनेज करा आणि आरोग्यदायी राहा; तुमच्या सर्वसमावेशक आरोग्य साथीदारासह

    फिटनेस गोल्सपासून ते वैद्यकीय रेकॉर्डपर्यंत, तुमचा संपूर्ण आरोग्य प्रवास एकाच ठिकाणी मॅनेज करा- महत्त्वाचे ट्रॅक करा, अपॉईंटमेंट शेड्यूल करा आणि वैयक्तिकृत माहिती मिळवा

    Healthmanager

    आरोग्यदायी राहा आणि रिवॉर्ड मिळवा- आजपासून सुरुवात!

    तुमच्या आरोग्य-निश्चित ध्येयांविषयी सक्रिय राहा, प्रगती ट्रॅक करा आणि सवलत मिळवा!

    Healthassetment

    तुमचा वैयक्तिक आरोग्य प्रवास येथे सुरू होतो

    केवळ तुमच्यासाठी तयार केलेला हेल्थ प्लॅन शोधा-माहिती मिळवा आणि तुमचे वेलनेस ध्येय प्राप्त करा

    Healthmanager

    तुमची सहनशीलता, अखंडपणे कनेक्ट केलेली

    तुमच्या आरोग्याच्या सर्व बाबी एकाच ठिकाणी कनेक्ट करून आमच्यासह इंटिग्रेटेड हेल्थ मॅनेजमेंटचा अनुभव घ्या

    स्‍टेप-बाय-स्‍टेप गाईड

    तुमच्या इन्श्युरन्स प्रवासामध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी.

    खरेदी कसे करावे

    • 1

      बजाज जनरल वेबसाईटला भेट द्या

    • 2

      वैयक्तिक तपशील टाईप करा

    • 3

      हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना करा

    • 4

      योग्य कव्हरेज निवडा

    • 5

      सवलत आणि ऑफर पाहा

    • 6

      पर्यायी लाभ जोडा

    • 7

      सुरक्षित पेमेंटसाठी पुढे जा

    • 8

      तत्काळ पॉलिसी कन्फर्मेशन प्राप्त करा

    रिन्यू कसे करावे

    • 1

      ॲपमध्ये लॉग-इन करा

    • 2

      तुमचे वर्तमान पॉलिसी तपशील टाईप करा

    • 3

      आवश्यक असल्यास कव्हरेज रिव्ह्यू करा आणि अपडेट करा

    • 4

      रिन्यूवल ऑफर पाहा

    • 5

      रायडर्स जोडा किंवा हटवा

    • 6

      तपशील कन्फर्म करा आणि पुढे सुरू ठेवा

    • 7

      रिन्यूवल देयक ऑनलाईन पूर्ण करा

    • 8

      तुमच्या पॉलिसी रिन्यूवलसाठी तत्काळ कन्फर्मेशन प्राप्त करा

    क्लेम कसा करावा

    • 1

      ॲप वापरून क्लेमविषयी बजाज जनरलला सूचित करा

    • 2

      सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करा

    • 3

      तुमच्या क्लेमसाठी कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट पद्धत निवडा

    • 4

      उपचार मिळवा आणि आवश्यक बिल शेअर करा

    • 5

      मंजुरीनंतर क्लेम सेटलमेंट प्राप्त करा

    पोर्ट कसे करावे

    • 1

      पोर्टिंगसाठी योग्यता पाहा

    • 2

      नवीन पॉलिसीच्या लाभांची तुलना करा

    • 3

      तुमची वर्तमान पॉलिसी कालबाह्य होण्यापूर्वी अप्लाय करा

    • 4

      तुमच्या विद्यमान पॉलिसीचा तपशील प्रदान करा

    • 5

      बजाज जनरलद्वारे जोखीम मूल्यांकन करा

    • 6

      बजाज जनरल कडून मंजुरी प्राप्त करा

    • 7

      तुमच्या नवीन पॉलिसीसाठी प्रीमियम भरा

    • 8

      पॉलिसी कागदपत्रे आणि कव्हरेज तपशील प्राप्त करा

    अनेकदा एकत्र खरेदी केले जाणारे

    सर्व पाहा

    काही क्लिकमध्ये ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करा

    आता लांबलचक फॉर्म भरण्याचे किंवा रांगेत उभे राहण्याचे दिवस गेले. तुम्ही आता सुरक्षित आणि अखंड प्रोसेसद्वारे बजाज जनरल इन्श्युरन्ससह ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करू शकता.

    हेल्थ गार्ड ऑनलाईन खरेदी करण्याच्या स्टेप्स:

    1. वेबसाईटला भेट द्या: https://www.bajajgeneralinsurance.com/ वर जा

    2. तुमचा प्लॅन निवडा: तुमच्या गरजांसाठी सर्वोत्तम पर्यायाच्या निवडीसाठी सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम प्लॅनची तुलना करा.

    3. प्रीमियम कॅल्क्युलेट करा: अंदाज मिळविण्यासाठी बिल्ट-इन प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरा.

    4. प्रस्ताव अर्ज भरा: वैयक्तिक आणि आरोग्य तपशील टाईप करा.

    5. वैद्यकीय चाचण्या: आवश्यक असल्यास, पॅनेलवरील सेंटरवर प्री-पॉलिसी चेक-अपची व्यवस्था केली जाते

    6. देयक भरा: नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरा.

    7. पॉलिसी प्राप्त करा: तुमच्या इनबॉक्समध्ये तुमची पॉलिसी कागदपत्रे त्वरित मिळवा.

    जलद, पारदर्शक आणि त्रास-मुक्त — अगदी इन्श्युरन्सच्या अपेक्षांना साजेसा.

    इन्श्युरन्स समझो

    KAJNN

    बचत विरूध्‍द वैद्यकीय खर्च

    KAJNN

    हेल्थ इन्श्युरन्स हा केवळ खर्च आहे का?

    KAJNN

    MHCP एज+

    KAJNN

    किती हेल्थ इन्श्युरन्स कव्हर पुरेसे आहे?

    होम इन्श्युरन्स-सर्व जोखीम कव्हर

    होम इन्श्युरन्स-लाँग टर्म कव्हर

    होम इन्श्युरन्स- कोणत्‍याही सामग्री घोषणापत्राची गरज नाही

    होम इन्श्युरन्स-जगभरात कव्हरेज

    तुमच्या डिजिटल सुरक्षिततेवर नियंत्रण मिळवा

    डाटा गोपनीयता दिवस | बजाज जनरल इन्श्युरन्स

    सायबर जागरुक बना

    आमची आर्टिकल्स पाहा

    सर्व पाहा
    LoginUser

    आमच्याकडे प्रोफाईल बनवा, नवीन लाभ मिळवा

    • तुमच्या सोयीप्रमाणे बदलणारे आणि वाढणारे प्लॅन्स
    • भविष्यातील माईलस्टोन्ससाठी सक्रिय कव्हरेज
    • तुमच्या प्रोफाईलला अनुरुप असा तज्ज्ञांचा सल्ला
    ॲप डाउनलोड करा

    आमचे ग्राहक, आमचा अभिमान

    अत्यंत समाधानी

    स्पष्ट पॉलिसी, सोपे रिन्यूवल आणि उत्तम कव्हरेज पर्याय. या हेल्थ इन्श्युरन्स ॲपबाबत मी अत्यंत समाधानी आहे.

    alt

    पियुष कुमार

    मुंबई

    5

    17 मार्च 2025

    हे घ्यायलाच हवे!

    या ॲपसह माझे आरोग्य, वाहन आणि सायबर इन्श्युरन्स मॅनेज करणे खूपच सोपे आहे. हे घ्यायलाच हवे!

    alt

    पूजा कौशिक

    वडोदरा

    5

    2 फेब्रुवारी 2025

    सोपे, जलद आणि प्रभावी!

    एकाच ठिकाणी सर्व वैशिष्ट्यांसह विश्वसनीय हेल्थ इन्श्युरन्स ॲप- सोपे, जलद आणि प्रभावी!

    alt

    रितिक मिश्रा

    दिल्ली

    5

    31 जानेवारी 2025

    हे ॲप खूप आवडले!

    माझ्या कुटुंबाचा हेल्थ इन्श्युरन्स मॅनेज करणे इतके सोपे आधी कधीच नव्हते. मला हे ॲप खूप आवडले!

    alt

    शगुन गुप्ता

    मुंबई

    4.8

    31 जानेवारी 2025

    विश्वसनीय आणि परवडणारे

    विश्वसनीय आणि परवडणारा मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन माझ्या कुटुंबासाठी संपूर्ण आरोग्य सुरक्षा देतो.

    alt

    शुभम सिंह

    दिल्ली

    5

    30 जानेवारी 2025

    आर्थिक सुविधा

    वैद्यकीय संकट तणावपूर्ण असतात, परंतु या हेल्थ प्लॅनद्वारे फायनान्शियल सोयीची खात्री मिळते

    alt

    पुष्पेंद्र गुर्जर

    मुंबई

    5

    30 जानेवारी 2025

    उत्तम कव्हरेज पर्यायही!

    बजाज जनरल ॲपवर प्रेग्नंसी हेल्थ इन्श्युरन्स शोधणे तणावमुक्त होते. कव्हरेज पर्यायही उत्तम आहेत!

    alt

    राजेश कुमार

    मुंबई

    5

    24 जानेवारी 2025

    यूजर-फ्रेंडली आणि कार्यक्षम!

    बजाज जनरलसह माझ्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करणे त्रासमुक्त आहे. त्यांचे ॲप यूजर-फ्रेंडली आणि कार्यक्षम आहे!

    alt

    गौतम मंगिया

    दिल्ली

    5

    24 जानेवारी 2025

    सामान्य प्रश्न

    हेल्थ गार्ड पॉलिसी घेण्यासाठी वयाची लिमिट किती आहे?

    18 वयापासून ते आजीवन व्यक्तींना कव्हर केले जाऊ शकते, तर 30 वर्षांपर्यंतचे अवलंबित मुले देखील पात्र ठरतात.

    हेल्थ गार्ड पॉलिसी अंतर्गत वेलनेस लाभ म्हणजे काय?

    उत्तम आरोग्य राखून तुमच्या पॉलिसीच्या रिन्यूवल वर तुम्ही 12.5% % पर्यंत वेलनेस लाभ सवलतीचा आनंद घेऊ शकता.

    हेल्थ गार्ड अंतर्गत दैनंदिन कॅश लाभ काय आहे?

    जर तुमचे विमाकृत मूल (12 वर्षांखालील) हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असेल तर तुम्ही प्रति दिवस ₹500 च्या दैनंदिन कॅश लाभासाठी योग्य आहात, ज्यामध्ये प्रति पॉलिसी वर्ष 10 दिवसांपर्यंत वाजवी राहण्याचा खर्च कव्हर केला जातो, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी मिळते.

    हेल्थ गार्ड प्लॅन अंतर्गत रिचार्ज लाभ काय आहे?

    जर दुर्दैवाने, क्लेम मध्ये तुमची विमा रक्कम लिमिट संपत असेल तर विमा रकमेच्या अतिरिक्त 20% (₹5 लाखांपर्यंत) उपलब्ध असेल. तथापि, हा लाभ विशेषत: प्लॅटिनम प्लॅन अंतर्गत ऑफर केला जातो.

    हेल्थ गार्ड प्लॅन अंतर्गत सुपर संचयी बोनस म्हणजे काय?

    जर तुम्ही प्लॅटिनम प्लॅन निवडला तर तुम्हाला सुपर संचयी लाभ मिळतो, ज्यामुळे पहिल्या दोन वर्षांसाठी प्रति वर्ष बेस विमा रकमेच्या 50% पर्यंत तुमची क्षतिपूर्ती लिमिट वाढते. त्यानंतर, ते पुढील पाच वर्षांसाठी प्रति वर्ष 10% पर्यंत वाढते.

    तुमच्या आरोग्यासाठी मेडिकल इन्श्युरन्स का आवश्यक आहे?

    मेडिकल इन्श्युरन्स अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण प्रदान करते. तुमची बचत संपू न देता दर्जेदार आरोग्यसेवेचा ॲक्सेस सुनिश्चित करते.

    मी माझ्या फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये अवलंबून असलेल्‍या किती सदस्‍यांना जोडू शकतो?

    तुम्ही पॉलिसीच्या अटींनुसार तुमचे पती / पत्नी, मुले, पालक आणि इतर अवलंबून असणाऱ्या सदस्यांना जोडू शकता आणि सर्वसमावेशक कुटुंबाचे कव्हरेज सुनिश्चित करू शकता.

    तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची ऑनलाईन तुलना का करावी?

    ऑनलाईन तुलना तुम्हाला तुमच्या गरजा आणि बजेटसाठी अनुकूल असलेला सर्वोत्तम प्लॅन शोधण्यास मदत करते, कव्हरेज आणि लाभांची स्पष्ट समज देते.

    तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमला कधीही विलंब का करू नये?

    प्रीमियम विलंबामुळे पॉलिसी लॅप्स होऊ शकते, कव्हरेज लाभ आणि आर्थिक संरक्षण गमावू शकते आणि पॉलिसी रिन्यू करण्यात अडचणी येऊ शकतात.

    तुमच्या बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडची फिजिकल कॉपी कशी मिळवावी?

    विमा प्रदात्‍या कडे फिजिकल कॉपीची विनंती करा किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या डिजिटल पॉलिसी कागदपत्रांची प्रिंटआऊट घ्या.

    हेल्थ कव्हर प्लॅन्सचा क्लेम करण्यासाठी काही कालमर्यादा आहे का?

    क्‍लेम नामंजूर होणे टाळण्यासाठी आणि वेळेवर प्रोसेसिंग सुनिश्चित करण्यासाठी पॉलिसीच्या अटींनुसार निर्धारित वेळेत ते सादर केले पाहिजेत.

    वैयक्तिक हेल्थ इन्श्युरन्समध्ये नेमक्या पूर्व-विद्यमान स्थिती काय आहेत?

    तुमचा वैयक्तिक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे असलेल्या वैद्यकीय स्थिती म्हणजे पूर्व-विद्यमान स्थिती होय. यासाठी कव्हरेजसाठी प्रतीक्षा कालावधी किंवा अपवाद आवश्यक असू शकतात. तुमच्या हेल्थ रेकॉर्ड बाबत पारदर्शक राहा.

    इन्श्युरर माझे हॉस्पिटल बिल कसे भरणार आहे?

    इन्श्युरर रिएम्बर्समेंटद्वारे हॉस्पिटलचे बिल कव्हर करतात (तुम्ही अपफ्रंट देय करता आणि नंतर परतफेड मिळवता) किंवा कॅशलेस हॉस्पिटलायझेशन (इन्श्युरर नेटवर्क हॉस्पिटल्ससह थेट बिल सेटल करतो).

    वैयक्तिक हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्याचे काही टॅक्स विषयक फायदे आहेत का?

    वैयक्तिक हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम अनेकदा इन्कम टॅक्स ॲक्टच्या (इंडिया) च्या सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स कपातीसाठी पात्र असतात.

    मला पर्सनल मेडिकल इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?

    पर्सनल मेडिकल इन्श्युरन्स आजार, अपघात किंवा हॉस्पिटलायझेशनमुळे उद्भवणाऱ्या अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण प्रदान करते. हे मनःशांती प्रदान करते आणि तुमच्या सेव्हिंग्सचे संरक्षण करते.

    मला हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स कसे रिन्यू करता येतील?

    छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव घेण्याची गरज नाही. तुमची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करण्याची सोपी आणि वेगवान पद्धत म्हणजे ती ऑनलाईन करणे. तुमचे हेल्थ इन्श्युरन्स कव्हर टॉप अप केल्यामुळे मोठ्या वैद्यकीय खर्चांपासून तुम्हाला स्वातंत्र्य मिळते.

    हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूवलचे प्रीमियम कसे कॅल्क्युलेट केले जाते?

    आम्हाला माहित आहे की हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या क्लिष्ट अटी आणि शर्ती वाचणे नेहमीच सोपे नसते. म्हणूनच, याचे सोपे उत्तर येथे आहे. तुमचा रिन्यूवल प्रीमियम तुमचे वय आणि कव्हरेज यांच्यावर आधारित असतो. नेहमीप्रमाणेच, तुम्ही हेल्थ इन्श्युरन्समध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करून जास्तीत जास्त चांगला वापर करू शकता.

    मी माझी कालावधी संपलेली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करू शकतो/ शकते का?

    होय, नक्कीच. जीवन खरोखरच व्यस्त असू शकते आणि तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन रिन्यू करणे साईड-लाईन होऊ शकते. बजाज जनरलमध्ये आम्ही ग्रेस कालावधी देतो, जिथे तुम्ही तुमची कालबाह्य पॉलिसी रिन्यू करू शकता. समाप्ती तारखेपासून 30 दिवसांसाठी, तुम्ही अद्याप तुमचे हेल्थ कव्हर सहजपणे रिन्यू करू शकता. आता, तुम्ही तुमच्या एठारे रेस चालवू शकता

    मला हेल्थ इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करता येईल का?

    नक्कीच! तुम्हाला तुमचा हेल्थ इन्श्युरन्स रिन्यू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही क्लिक्स किंवा टॅप्स करावे लागतील! तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन रिन्यू करू शकता आणि तुमच्या कुटुंबासाठी तसेच मित्रांसाठी नवीन पॉलिसी घेऊ शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    मी अन्य प्रोव्हायडर्सकडून माझी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर करू शकेन का?

    हो, IRDAI च्या नियमांनुसार दोन प्रोव्हायडर्स मध्ये इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी शक्य आहे. यात आधी अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी प्रतीक्षा कालावधींशी संबंधित संचयी बोनस आणि क्रेडिट यांचे लाभांचे ट्रान्सफर देखील समाविष्ट आहेत.

    PromoBanner

    जर एक ॲप सर्व करू शकते तर वेगवेगळ्या पॉलिसी सांभाळण्याची काय गरज?

    आत्ताच ॲप डाउनलोड करा!